• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ! ; जामनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतात अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ! ; जामनेर तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे शेतात काम करताना अचानक पाऊस सुरु झाला. तेव्हा कोंबड्याना खाद्य टाकण्यास गेलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दि. ११ मे रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ऐन मातृदिनाच्या दिवशीच महिलेची ५ मुले पोरकी झाली आहे. तर तहसीलदार व अधिकाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत मयत महिलेच्या परिवाराला रुपये ४ लाख शासनाच्या वतीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

हिराबाई गजानन भिल (वय ३८, रा. बिलवाडी ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती, ४ मुली, १ मुलगा यांचेसह बिलवाडी येथील दिलीप हरी भावसार यांच्या शेतशिवारातील घरात राहत होत्या. दोन्ही पती-पत्नी शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, रविवारी दुपारी ४ वाजता जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात घराजवळ एका झाडाखाली असलेल्या कोंबडीच्या पिल्लाना भर पावसात हिराबाई ह्या अन्न-पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी निंबाच्या झाडावर जोरदार वीज पडली व ती खाली असलेल्या हिराबाई यांच्या अंगावरच कोसळली.

या भयावह घटनेत हिराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ग्रामस्थांनी पहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी महिलेच्या लहान मुलांनी तसेच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे बिलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेबाबत पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी दि. १२ मे रोजी सकाळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन सानप, मंडळ अधिकारी व इतर अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून हिराबाई यांच्या परिवाराचे सांत्वन केले. तसेच शासनातर्फे ४ लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार आगळे यांनी हिराबाई भिल यांच्या परिवाराला दिले आहे.

Next Post
भडगाव नगरपरिषदेच्या विकासकामाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते लोकार्पण

भडगाव नगरपरिषदेच्या विकासकामाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add