• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

फैजपूर-आमोदा मार्गावरील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

जळगाव/अमोदा, (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी १ ते दीड वाजेच्या सुमारास मालवाहू रिक्षा आणि प्रवासी रिक्षा यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली. यात ट्युशनला जात असलेली सावदा येथील एका डॉक्टरांची १२ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे. तर इतर २ विद्यार्थ्यांसह एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. फैजपूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

अदिती सोपान खडसे (वय १२, रा. सावदा ता. रावेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. सावदा येथील दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची ती कन्या आहे. अदितीच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ असा परिवार आहे. रविवारी दि. ४ रोजी प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच १९ सीडब्लू ३५९०) ही प्रवाशांना आणि ट्युशनला जाणाऱ्या डॉक्टरांच्या मुलांना घेऊन आमोदा येथून फैजपूरकडे येत होती. तेव्हा फैजपूरकडून आमोदाकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच १९-७०६४) ने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेत दोन्ही वाहने पलटी झाली. या अपघातात डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदिती सोपान खडसे हीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर शंतनु सरोदे यांच्या मुलाला किरकोळ खरचटले असून आणखी एक ओझल नामक मुलीला भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर अजून एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे. घटनास्थळी फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले. मयत अदितीचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टरांनी एकाच गर्दी केली. सावदा गावावर शोककळा पसरली आहे.

Tags: accident
Next Post
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

ताज्या बातम्या

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group