• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धावत्या रेल्वेतून पडून कबड्डी खेळाडूचा मृत्यू

पाचोरा तालुक्यात तारखेडजवळ घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 30, 2025
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
धावत्या रेल्वेतून पडून कबड्डी खेळाडूचा मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेतून पडून धुळे जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशाल किरण बोरसे (वय २५, रा.बोरिस ता.जि. धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होता. पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली होती. पाचोरा ते गाळण रेल्वे स्टेशनदरम्यान तारखेडा गावानजीक ऑफलाइनवरील खंबा किलोमीटर क्रमांक ३६५/२०१८ दरम्यान अज्ञात तरूणाचा मृतदेह असल्याबाबतची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेतली.

पंचनामा करत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला होता. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पाचोरा पोलीस करीत असतानाच त्यांना तरुणाबाबत माहिती मिळाली. धुळे तालुक्यातील बोरीस येथील रहिवासी तर सुरत येथे शिक्षण घेणारा २५ वर्षीय विशाल किरण बोरसे असे या विद्यार्थ्यांचे नाव निष्पन्न झाले. सैनिक भरतीचा पेपर देण्यासाठी रेल्वेने सुरतवरून जळगाव मार्गे मुंबईकडे व नंतर मित्रासोबत सिकंदराबादला रवाना होणार होता. रस्त्यात हि दुर्घटना घडली. विशाल हा उत्तम कबड्डी खेळाडू असल्याने सैनिकात नोकरीचे स्वप्न घेऊन तो जगत होता. त्याचं स्वप्न अपूर्ण राहीले व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Tags: accident
Next Post
इलेक्ट्रिकचे दुकान फोडून २ लाखांचा ऐवज लांबविला ; जळगावातील घटना

इलेक्ट्रिकचे दुकान फोडून २ लाखांचा ऐवज लांबविला ; जळगावातील घटना

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम
आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम

May 30, 2026
आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
क्रिडा

आय.पी.एल. चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!

May 30, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हे

चोपड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, ११ जणांवर गुन्हा दाखल

May 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group