• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धा संपन्न

नईम अन्सारी विजेता तर रईस शेख उपविजेता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 30, 2025
in क्रिडा, खान्देश
0
अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धा संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कॅरम असो. च्या मान्यतेने व जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना द्वारे आयोजित ७ व्या कै. अप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या नईम अन्सारी याने तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर च्या रईस शेख याचा २–० सेटने पराभव करून विजेतेपदासह रोख रुपये ५००१/– व चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले.

रईस शेख यास रोख रुपये ३००१/– व चषक बक्षिस मिळाले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोशन शेख रोख रुपये २००१/– व चषक आणि चतुर्थ रोख रुपये १५०१/– व चषक अय्यूब खान याने प्राप्त केले. क्रमांक ५ ते ८ चे प्रत्येकी रोख रुपये १००१/– चे पारितोषिक अनुक्रमे आवेज शेख ( प्लाझा क्रीडा संस्था), शेख हबीब ( एकता क्रीडा मंडळ), सैय्यद मुबश्शीर ( प्लाझा) व सैय्यद मोहसिन ( जैन स्पोर्टस् अकॅडमी ) यांनी प्राप्त केले.

स्पर्धेतील एकमेव ओपन टू फिनिश ची नोंद जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या परेश देशपांडे यांनी केली. बक्षिस वितरण कार्यक्रमा करिता सर्वश्री ॲड. रविंद्र कुलकर्णी, युसूफ मकरा, सुयश बुरकुल, रोहित कोगटा, शरीफ खान व इतर मान्यवर उपस्थितीत होते. पाहुण्यांचे स्वागत सैय्यद मोहसिन, शेख हबीब, मोहम्मद फजल, नासिर खान व आताऊल्लाह खान यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान यांनी केले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून आयशा खान, चंद्रशेखर नरवरिया आणि सरफराजुल हक यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेत जळगाव जिल्हाभरातून एकूण ४८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

शिव छत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यांचे विशेष सत्कार..
या प्रसंगी नुकताच २०२३–२४ सालाकरिता जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास महाराष्ट्र सरकार तर्फे श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (कॅरम खेळाडू) म्हणून प्राप्त झाले. त्या बद्दल त्यांचे विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धेतील अंतिम निकाल..
विजेता – नईम अन्सारी ( जैन इरिगेशन)
उपविजेता – रईस शेख ( तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर)
३ रा क्रमांक – रोशन शेख (तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर)
४था क्रमांक – अय्यूब खान ( तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर)
५वा क्रमांक – आवेज शेख (प्लाझा क्रीडा संस्था)
६ वा क्रमांक – हबीब शेख (एकता क्रीडा मंडळ)
७ वा क्रमांक – सैय्यद मुबश्शीर (प्लाझा क्रीडा संस्था)
८ वा क्रमांक – सैय्यद मोहसिन (जैन स्पोर्ट्स अकॅडमी).

Tags: #jalgaon_city#sports
Next Post
धावत्या रेल्वेतून पडून कबड्डी खेळाडूचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडून कबड्डी खेळाडूचा मृत्यू

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add