• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फटाका फॅक्टरी आगीत २१ जणांच्या मृत्यू प्रकरणी तिघांना दहा वर्षे कारावास ; न्यायालयाचा निर्णय

१६ वर्षांपूर्वी पारोळ्यात आगीची घडली होती घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
फटाका फॅक्टरी आगीत २१ जणांच्या मृत्यू प्रकरणी तिघांना दहा वर्षे कारावास ; न्यायालयाचा निर्णय

अमळनेर, (प्रतिनिधी) : पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स या फटाक्यांच्या फॅक्टरीत १६ वर्षांपूर्वी लागलेल्या भिषण आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघा मालकांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत १० एप्रिल २००९ रोजी मोठी आग लागली होती. स्फोटक पदार्थ असल्याने आगीचे लोळ उठत होते. तात्काळ आग पसरून त्या आगीत पारोळा येथील स्त्री, पुरुष कामगार, बाल कामगार यांच्यासह २१ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तर सुमारे ३९ जण जखमी झाले होते. या बाबत पारोळा पोलीस स्टेशनला भा दं वि कलम ३०४(२) , ३३७ , ३३८ , २१२ व स्फोटक कायदा १८८४ च्या कलम ९ (ब )१ (अ), ९ (ब) (१)(ब) तसेच बाल कामगार बंदी नियमन कायदा १९८६ च्या कलम १४ (१ ) प्रमाणे गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे, मनीषा चंद्रकांत शिरोळे या मालकांसह व्यवस्थापक, पर्यवेक्षक आणि कामगार, ठेकेदार अशा ९ जणांवर मृत्यूस कारणीभूत व स्फोटक पदार्थांच्या बाबतीत बेजबाबदारपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात असे आढळून आले होते की, आग लागण्याच्या काही दिवस आधीच कारखान्याच्या परवान्याची मुदत संपली होती. कामगारांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण दिले नव्हते. तसेच सुविधा नव्हत्या, बालकामगारांचे नियम पाळले गेले नव्हते. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. या प्रकरणी स्फोटक कारखान्यांबाबत असलेल्या आयुक्तांकडे देखील सुनावणी होऊन जखमी व मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली होती. अमळनेर न्यायालयात एकूण ४२ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात एकूण ३८ साक्षीदार फितूर झाले होते.

मात्र न्या. सी. व्ही. पाटील यांनी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक शरद घुगे, डॉ योगेश पवार, तपासी अधिकारी प्रकाश हाके, जबाब घेणारे तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांची साक्ष ग्राह्य धरून फॅक्टरी मालक आरोपी गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे, मनीषा चंद्रकांत शिरोळे या तिघांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४(२) प्रमाणे दहा वर्षांचा कारावास तर स्फोटक कायदा कलम ९(ब) प्रमाणे २ वर्षांचा कारावास अशी शिक्षा आणि अनुक्रमे १० हजार व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. उर्वरित सहा आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकार पक्षातर्फे सुरुवातीला ऍड. मयूर अफूवाले, नंतर ऍड राजेंद्र चौधरी यांनी काम पाहिले.


Next Post
महिलांचे विवस्र व्हिडिओ काढून व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

महिलांचे विवस्र व्हिडिओ काढून व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group