• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे मालगाडीतुन १२७ खताच्या बॅग लांबविल्या, तीन जणांना अटक

जळगाव रेल्वे पोलीसांची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वे मालगाडीतुन १२७ खताच्या बॅग लांबविल्या, तीन जणांना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव-सुरत रेल्वे लाइनवरील उभ्या मालगाडीच्या वॅगनचा दरवाजाचे सील तोडून चोरट्यांनी १२७ खताच्या बॅग लांबविल्याची तक्रार जळगाव रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिस दलाकडे २७ मार्च रोजी नोंदविण्यात आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी पिंपळकोठा येथून तीन आरोपींना अटक करीत ७५ पोती जप्त केली आहेत. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली.

सुरत जळगाव रेल्वे लाइनवरील गुड शेडमध्ये दि. २६ मार्च रोजी मालगाडी उभी असताना एका वॅगनच्या दरवाजाचे सील उघडून चोरट्यांनी ७८ हजार ७४० रुपये किमतीची १२७ खताची पोती चोरून नेली. त्यानंतर आरपीएफ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक शिवपूजन सिंह, एस. बी. चौधरी, कॉन्स्टेबल पंकज वाघ, विनोद जेठवे यांनी तपास सुरू केला.

तपासातून योगेश बडगुजर (वय ४६, रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) याची चौकशी केली असता १२७ खताची पोती दोन जणांच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. काही गोण्या विशाल पाटील, लीलाधर बडगुजर यांना विकल्या. याप्रकरणी योगेश बडगुजर, विशाल पाटील, लीलाधर बडगुजर यांना गुरुवार दि.३ रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. अन्य फरार दोन आरोपींचा तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.

Tags: Crime
Next Post
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group