• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शस्त्र बाळगणाऱ्या ३ तरुणांना अटक ; ४ धारदार तलवारी जप्त

भुसावळ शहरात जळगाव एलसीबीची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 4, 2025
in गुन्हे
0
शस्त्र बाळगणाऱ्या ३ तरुणांना अटक ; ४ धारदार तलवारी जप्त

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील इंदिरा नगर परिसरात तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १ एप्रिल रोजी धडक कारवाई करून तिघांना अटक केली. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. भुसावळ शहरात इंदिरा नगर परिसरात काही तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची गुप्त माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ. कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे आणि पोकॉ. सचिन पोळ यांनी संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला.

पथकाने इंदिरा नगर परिसरात छापा टाकून भरत यादव खंडारे (वय १९), सागर अनिल संघवी (वय २०) आणि सागर राजू यादव (वय २५, सर्व रा. इंदिरा नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तिघांकडे पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडे विनापरवाना ४ धारदार तलवारी सापडल्या. जप्त करण्यात आलेल्या तलवारींची एकूण किंमत ६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिन्ही आरोपींविरोधात भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Next Post
कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ भीषण अपघात ; ३ ठार, ५ गंभीर

कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ भीषण अपघात ; ३ ठार, ५ गंभीर

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add