• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतजमीनीच्या जुन्या वादातून चुलत्याचा खुन ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 31, 2025
in गुन्हे
0
शेतजमीनीच्या जुन्या वादातून चुलत्याचा खुन ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकळी शिवारात शेतजमीनीच्या जुन्या वादातून चुलतभावाने तरुणाचा अज्ञात हत्यारांनी वार करून खून केल्याची धक्कादायक घटना तपास व फिर्यादीतून समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुनील रामसिंग चव्हाण (वय-३२, रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुनील चव्हाण हा परिवारासह टाकळी गावात वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान त्याचे चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाण यांचेसोबत सुनिल चव्हाण यांचा शेत जमीनीचा जूना वाद होता. दि.२५ मार्च रोजी सायंकाळीच्या सुमारास सुनील हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी दुचाकी क्र. (एमएच १९ एसी ४४७३) ने निघून गेला होता. दरम्यान त्यानंतर तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सुमारास सुनील चव्हाण याचे नातेवाईक रस्त्यावरून येत असताना टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या शेताजवळ सुनिल चव्हाण यांचा दुचाकीजवळ मृतदेह आढळून आला.

यावेळी त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून येत होते. दरम्यान, या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मयत सुनील चव्हाण यांचा भाऊ संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव (दोन्ही रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील एकाला अटक केल्याचे समजते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहे.

Next Post
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा अंदाज

ताज्या बातम्या

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add