• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून घेतले विष ; उपचारादरम्यान मृत्यू !

जामनेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून घेतले विष ; उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वडगाव येथील एका शेतकऱ्याने शुक्रवारी दि.२१ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतातच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

मुन्ना उखर्डू बावस्कर (वय ४५, रा. वडगाव ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. आई, पत्नी, ३ मुले, १ मुलगी असा त्यांचा परिवार आहे. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, वडगाव शिवारात असलेल्या शेतात मुन्ना बावस्कर यांनी शुक्रवारी दि.२१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९.३० वाजता उपचारासाठी दाखल केले.

अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना दुपारी साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मयत मुन्ना बावस्कर यांनी कर्ज घेतलेले होते. त्या विवंचनेत ते असायचे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेमुळे वडगाव गावात शोककळा पसरली आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Next Post
उड्डाणपुलावर मालवाहू रिक्षाने घेतला अचानक पेट, वाहन जळून खाक !

उड्डाणपुलावर मालवाहू रिक्षाने घेतला अचानक पेट, वाहन जळून खाक !

ताज्या बातम्या

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

गर्जना ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगावात शिवजयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

February 19, 2026
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल
गुन्हे

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

February 19, 2026
टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न
आरोग्य

टोके शाळेत लिनेस क्लबतर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिर संपन्न

February 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group