एरंडोल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील रिंगणगाव येथील योगेश शंकर हटकर (वय ३५) या तरुणाने त्यांच्या राहत्या घरी सुताच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १६ मार्चला दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात रिंगणगाव येथील दगडू निंबा हटकर यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, योगेश हटकर यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी लक्षात आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. नीलेश गायकवाड यांच्या आदेशानुसार पो.ना. दत्तात्रय ठाकरे करत आहेत.