• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अहमदाबादच्या टेलरला मुक्ताईनगरातील जंगलात लुबाडले

एक लाखाच्या बदल्यात मिळाल्या ७ लाखांच्या खेळण्यातील नोटा !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
अहमदाबादच्या टेलरला मुक्ताईनगरातील जंगलात लुबाडले

भुसावळ, (प्रतिनिधी) : अहमदाबादमधील टेलरला १ लाखाच्या मोबदल्यात ७ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बोलावून लुबाडण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. संशयित आरोपींची ७ लाखांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा दाखवून फसवणूक केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली.

तक्रारदार नदीम अब्दुल सलाम सैफी (मूळ रा.हमीरपूर, तांडा, जि.रामपूर, उत्तर प्रदेश, ह.मू. देवराज इण्डस्ट्रीज, नरोल चौक, सीटीएम – लांबा, अहमदाबाद) हे व्यवसायाने टेलर आहेत. फेसबुक पाहताना त्यांना १ लाख रुपयांच्या मोबदल्यात ७ लाख रुपये मिळतील, या जाहिरातीने भुरळ घातली. जाहिरातीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संशयित मनजीतसिंग याने जाहिरातीची पुष्टी करीत त्यासाठी मुक्ताईनगरला यावे लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने कुरियरने नोटा पाठवाव्यात, असे सांगितल्यानंतर संशयित आरोपीने अशा पद्धतीने नोटा पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर शुक्रवारी दि. १४ मार्च रोजी संशयिताने पुन्हा तक्रारदाराला संपर्क केल्यानंतर शनिवारी दि.१५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता तक्रारदार नदीम हे रेल्वेने भुसावळात आले.

भुसावळ येथून तक्रारदार नदीम सैफी हे बसने मुक्ताईनगरला आल्यानंतर संशयित आरोपींनी त्यांना घेण्यासाठी रिक्षा पाठवली व धामणगाव येथे आणले. या वेळी १ लाख रुपये दिल्यानंतर त्यांना पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचे प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेले १४ बंडल देण्यात आले. त्यानंतर तक्रारदार भुसावळात मुक्कामी थांबलेल्या एका हाॅटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी रात्री नोटांचे बंडल उघडून पाहिले असता बंडलच्या पहिले व शेवटी पाचशे रुपयांची नोट होती. मात्र आतील बंडलमध्ये ‘भारतीय बच्चों का बैंक’ लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यातील सर्व नोटा असल्याने तक्रारदाराला मोठा धक्का बसला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार (चारठाणा, ता. मुक्ताईनगर), अविनाश रुबासन पवार (मधापुरी, ता. मुक्ताईनगर) व एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांची मदत घेत संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार, अविनाश पवार यांना अटक केली. दोघं संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.


Next Post
तरुणाची आत्महत्या ; एरंडोल तालुक्यातील घटना

तरुणाची आत्महत्या ; एरंडोल तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group