जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रविवार दिनांक १६ मार्च रोजी मुंबई येथे शिवसेना तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीला जळगावहून युवासेना उत्तर महाराष्ट्राचे (नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार) विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा युवाधिकारी प्रीतम शिंदे, उपजिल्हायुवाधिकारी विशाल वाणी, महानगर युवाधिकारी संदीप सूर्यवंशी, शहर युवाधिकारी अजय खैरनार उपस्थित होते.