• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

शुभम शर्माचे ४ महत्त्वपूर्ण बळी; कर्णधार प्रतिक शर्माचे नाबाद शतक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 17, 2025
in क्रिडा
0
जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लबच्या संघावर तीन विकेट ने विजय प्राप्त करून प्रतिष्ठित अशा द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. यात जैन इरिगेशनच्या शुभम शर्माने ४ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या तर कर्णधार प्रतिक शर्मा याने नाबाद शतकी खेळी साकारली.

‘सी’ डिव्हिजनच्या या विजयामुळे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चा ‘ब’ संघ आता पुढील वर्षी (२०२५-२६) ‘बी’ डिव्हिजन मध्ये पदोन्नित झाला आहे. या विजयाबरोबर जैन इरिगेशन संघाने मुंबईतील टाइम्स व कार्पोरेट चषकावर आपले नाव नोंदवून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या विजयी संघाचे खेळाडू प्रशिक्षक यांचे अभिनंदन जैन इरिगेशन संघाचे संयोजक मयंक पारिख, अरविंद देशपांडे तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे.

मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लब यांच्यात रंगला. या सामन्याची नाणेफेक जैन इरिगेशन व संघाचा कर्णधार प्रतीक यादव ने जिंकून रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लब ला फलंदाजासाठी पाचरण केले. रिलायन्स स्पोर्ट्स क्लब यांनी चांगली सुरुवात करत वेदांत पाटील ५४ (५४) धावा, शुभम पुजार्थि २५ (३७) धावा वेदांत खांबे नाबाद ४७ (६१) आणि जगदीश जाधव नाबाद ४१ (२७) आठव्या गडासाठी नाबाद ८० धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी करीत आपल्या संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. जैन इरिगेशन संघाने मंदगती गोलंदाजी केल्याने याचा फटका त्यांना बसला. रिलायन्स ग्रुप संघाला तब्बल ४० दंडात्मक धावा त्यामुळे बहाल केल्या व अशा प्रकारे रिलायन्स ग्रुप स्पोर्ट्स क्लब यांनी ४३ षटकात सात गडी गमावत २५२ धावा करून जैन इरिगेशन ‘ब’ संघासमोर २५३ धावांचे लक्ष्य ठेवले. जैन इरिगेशनतर्फे गोलंदाजीमध्ये शिवम यादव व अमित गावंडे प्रत्येक १ विकेट तर शुभम शर्मा याने ४ विकेट घेत रिलायन्स ग्रृपचा डाव गुंडाळण्यास हातभार लावला.

निर्धारीत ४५ षटकांत २५३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या जैन इरिगेशनच्या ‘ब’ संघाची सुरवात अडखडत झाली. जैन इरिगेशन संघाचा कर्णधार प्रतीक यादव याने कर्णधारास साजेशी अशी नाबाद ११०(११८) धावांची खेळी करत संघाला विजयी पथावर नेले. त्यात त्याने ७ चौकार व २ षटकारांची आतिषबाजी केली. त्याला शिवम यादव ४० (२४) आरुष पाटणकर २६ (३८) व ऋषिकेश गोरे नाबाद २६ (१५) यांनी चांगली साथ दिली या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद ६४ धावांची भागिदारी करत संघाला विजयी केले. २५३ धावांचे लक्ष्य ४४.४ षटकांत पुर्ण करून अंतिम सामन्यात दिमाखदारपणे विजय प्राप्त केला.


Next Post
बस अपघात : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान इम्फाळमधे मृत्यू !

बस अपघात : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान इम्फाळमधे मृत्यू !

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group