• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एसीबीच्या सापळ्यात महावितरणचा अभियंता अडकला

लाच घेताना चोपड्यात रंगेहात अटक

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
एसीबीच्या सापळ्यात महावितरणचा अभियंता अडकला

चोपडा, (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने एका मोठ्या सापळा कारवाईत सहायक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (वय ३५) याला लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार चोपडा शहरात घडला असून, संशयित आरोपी अमित दिलीप सुलक्षणे हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, चोपडा शहर कक्षा २ मध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने एका २३ वर्षीय तक्रारदाराच्या घरात नवीन वीज मीटर बसवण्यासाठी ५,५०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ४,५०० रुपये ठरवण्यात आले. बुधवारी त्याला ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, १२ मार्च रोजी सापळा रचून संशयित आरोपीला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सदरची कारवाई जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो. कॉ. प्रणेश ठाकूर, पो. ना. मराठे आणि पो. ना. राकेश दुसाने यांचा समावेश होता.

Next Post
महिलेच्या पर्समधून ५० हजार रुपये लांबविले ; महात्मा फुले मार्केट मधील घटना

महिलेच्या पर्समधून ५० हजार रुपये लांबविले ; महात्मा फुले मार्केट मधील घटना

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add