• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बॅनर लावताना विजेचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू ; जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
बॅनर लावताना विजेचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू ; जळगाव शहरातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील विमानतळाच्या समोर बोहरा इंडस्ट्रीजजवळ बॅनर लावत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने खाली पडून मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

अनिल पापा गवळी (वय ५३, रा.कांचन नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते पत्नी, दोन मुले यांचेसह राहत होते. हातमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दि. १२ मार्च रोजी सकाळी ते बॅनर लावण्यासाठी विमानतळाच्या समोर गेले होते. लोखंडी सापळ्यावर बॅनर लावत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का लागल्यामुळे ते खाली पडले.

आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Next Post
एसीबीच्या सापळ्यात महावितरणचा अभियंता अडकला

एसीबीच्या सापळ्यात महावितरणचा अभियंता अडकला

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group