जळगाव, दि. 16 – महानगरपालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त सामाजिक उपक्रमातून जळगाव शहरातील सागर पार्क येथे सार्वजनिक स्वच्छता गृहाची निर्मिती करण्यात आलीये. या स्वच्छतागृहाच्या निर्मितीसाठी नगरसेवक बंटी जोशी आणि नितीन बरडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते स्वच्छता गृहाचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले.
ज्याप्रमाणे आपण घरातले सौचालय स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालय देखील स्वच्छ कसे राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे. असे मत पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशा सामाजिक उपक्रमात कंपनीला आपला खारीचा वाटा उचलता आला असल्याचे सुप्रीम कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एस वाय प्रभूदेसाई यांनी सांगितले.
जळगाव शहरात अशा प्रकारचं हे दुसरं स्वच्छतागृह तयार झाला असून, यापुढे देखील शहरात नागरिकांच्या सुविधेसाठी आणखी चार स्वच्छतागृह सुप्रीम इंडस्ट्रीज करून देण्यासाठी साकडं घातले असल्याचे नगरसेवक बंटी जोशी यांनी सांगितले.
स्वच्छतागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, सभागृहनेते ललित कोल्हे, नगरसेवक नितीन बरडे, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, सुप्रीम कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एस वाय प्रभूदेसाई, जी के सक्सेना आदी मान्यवर उपस्थित होते.