• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

क्रीडा महाकुंभात पारंपारिक खेळ स्पर्धेचे आयोजन

कबड्‌डी, लगोरी, लंगडी, लेझीमच्या होणार स्पर्धा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 5, 2025
in क्रिडा
0
क्रीडा महाकुंभात पारंपारिक खेळ स्पर्धेचे आयोजन

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यावतीने १ ते ९ मार्चदरम्यान विभागीय क्रीडासंकुल येथे क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी जिल्हयातील शासकिय व अशासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांचे पारंपारिक जिल्हा क्रिडास्पर्धा महाकुंभ जिल्हा क्रिडासंकूल, जळगाव व बाहेती कॉलेज, जळगांव येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्पर्धेत जिल्ह्यातील अशासकीय आयटी आय २० संघ तसेच शासकीय आय टी आय १६ संघ सहभागी होणार आहेत. भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पुरुष व महिला गटात पंजा लढविणे ही वैयक्तिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर पावनखिंड दौड ही वैयक्तिक स्पर्धा विभागीय स्तरावर होणार आहे. सांघिक स्पर्धेमध्ये कबड्‌डी स्पर्धा महिला व पुरुष अशा गटात होणार आहे. फुगडी स्पर्धा सांघिक स्वरुपात होणार असून प्रत्येक संघात कमीतकमी ४ खेळाडू असणार आहेत.

लंगडी स्पर्धेत पुरुष व महिला असे गट असतील. यात सात मिनिटांचा एक डाव असेल ९ जण खेळतील व तीन राखीव असा १२ जणांचा संघ राहणार आहे. तर विटी-दांडू स्पर्धा सांघिक स्वरुपात होणार असून महिला आणि पुरुष गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यात ९ जण खेळतील व ३ जण राखीव असतील. दोरीवरच्या उड्या ही स्पर्धा वैयक्तिक गटात खेळविली जाणार आहे. ३० सेकंदात सर्वात जास्त उड्‌या मारणाऱ्या स्पर्धकास विजयी घोषीत केले जाणार आहे. लगोरी खेळाची सांघिक स्पर्धा होणार असून ही स्पर्धा पुरुष व महिला गटात खेळविण्यात येणार आहे. आठ जण मैदानात तर दोन जण राखीव असतील. रस्सीखेच स्पर्धा सांधिक स्वरुपात होणार असून ८ जण मैदानात व २ जण राखीव अशी रचना असेल. जो संघ दोन डाव जिंकेल तो विजयी होणार आहे. खो-खो स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात होणार आहेत. ९ जण व ३ राखीव असा १२ जणांचा संघ असेल. यात दोन डाव चौदा मिनिटांचे असतील. संघास सादरीकरणासाठी पाच मिनिटे मिळतील, वेशभूषा सुरुवात आणि सादरीकरणासाठी अतिरिक्त गुण असतील.

सांघिक लेझीम स्पर्धादेखील होणार असून प्रत्येक संघात कमीत कमी २४ खेळाडू असतील. संघास सादरीकरणासाठी ७ मिनिटे मिळतील तसेच वेशभूषा सुरुवात व सादरीकरण यासाठी अतिरिक्त गुण असतील. या स्पर्धेचे उ‌द्घाटन शासकीय अभियांत्रिकी वि‌द्यालय प्राचार्य श्री गजरे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमूख पाहुणे म्हणुन शासकीय तंत्र निकेतनचे डॉ. पराग पाटील तसेच मनोज महाजन व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नवनीत चव्हाण, संस्थेच्या उपप्राचार्य राजश्री पाटील हे असतील.

या कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथील सर्व गटनिदेशक शिल्पनिदेशक व सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Next Post
ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

ऑस्ट्रेलिया-भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्या

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group