• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम ; अन बुडणाऱ्या व्यक्तीचे वाचवले प्राण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 22, 2025
in जळगाव जिल्हा
0
तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम ; अन बुडणाऱ्या व्यक्तीचे वाचवले प्राण

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : चांगदेव महाराज तापी-पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी एसडीआरएफ व आपदा मित्र यांच्या कार्यप्रणालीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व सरपंच चांगदेव आदी उपस्थित होते.

तापी-पूर्णा संगमावर प्रवासी बोटीतून संगमदर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पाण्यात पडण्याचा प्रकार घडला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तैनात असलेल्या बोटीने तातडीने बचाव कार्य करत संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार दिले. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व गर्दी नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमच्या बचाव कार्याचा आढावा घेत रंगीत तालीम राबवण्यात आली.

दरम्यान, श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिर (मेहुण) परिसरात गवताला आग लागल्याची दुसरी घटना घडली. तहसीलदार मुक्ताईनगर यांनी तातडीने बोदवड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचित केले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम उपक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमचे अधिकारी व जवान तसेच आपदा मित्र उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार यावर्षी सदर यात्रेचे पूर्वनियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यानुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली.

Next Post
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर हल्ल्याचा प्रयत्न ; खंडणी मागत असल्याचा प्रकार उघडकीस

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group