• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात २७ लाखांचे बायोडिझेल जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 20, 2025
in गुन्हे
0
जळगावात २७ लाखांचे बायोडिझेल जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील अजिंठा चौफुली येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत ते जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी दि.१८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता केली आहे. या संदर्भात रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन चालकांसह त्यांच्या टँकर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस पथक मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजता गस्तीवर असताना अजिंठा चौफुली येथून संशयास्पदरित्या जाणारे दोन ट्रँकर पोलिसांनी थांबवले. त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही ट्रँकरमध्ये बायोडिझेल भरलेले आढळून आले. दरम्यान पोलिसांनी टँकर क्रमांक (जीजे १२ बीटी ११८१) आणि (जेजे १२ बीटी ४२८४) अशी दोन्ही वाहने हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्याचे उघडकीला आले.

या संदर्भात पोलीस नाईक विकास सातदिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक सद्दाम सय्यद अकबर (वय-२३, रा.कच्छ, राज्य गुजरात) आणि लतीफ भाई फकीर मोहम्मद हिंगोरजा (वय-२४, रा.आडेचार जि.कच्छ राज्य गुजरात) यांच्यासह टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (वय-२१, रा.उकडी ता. बुलढाणा) आणि सुलेमान इलियास छेरेया (रा. वरसाना कच्छ राज्य गुजरात) या ४ जणांना विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके हे करीत आहे.

Next Post
भजन संध्येत भाविकभक्त झाले दंग

भजन संध्येत भाविकभक्त झाले दंग

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित
जळगाव जिल्हा

डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

June 24, 2026
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर
शैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group