• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वेमध्ये चोऱ्या करणारी नायडू गँग जेरबंद

पावणेतीन लाखांच्या मुद्देमालासह दोन धारदार चाकू जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 6, 2025
in गुन्हे
0
रेल्वेमध्ये चोऱ्या करणारी नायडू गँग जेरबंद

अमळनेर, (प्रतिनिधी) : अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर असलेल्या नायडू गॅंगला अखेर जेरबंद करण्यात अमळनेर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. रेल्वेमध्ये चोऱ्या करण्यात नायडू गँगला पटाईत होती. दरम्यान अमळनेरच्या रेल्वे पोलिसांनी गॅंग मधील चार जणांना अटक केली असून त्यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दि.४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता मध्य रेल्वे च्या खंडवा, भुसावळ आणि जळगाव आरपीएफ कडून मोबाईलवर अमळनेरचे एएसआय कुलभूषणसिंग चौहान याना माहिती मिळाली होती की, खंडवा स्टेशनवर प्रवाश्यांचा सामान चोरी झाल्याची घटना घडली असून त्यात एक गँग सामील आहे आणि ते एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर कपडे बदलवून रूप बदलतात असे सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त झाले असून खंडवा स्टेशनवर एफआयआर दाखल झाली आहे.

 

नंतर हे सराईत गुन्हेगार भुसावळ उधना गाडी क्रमांक १९१०६ मध्ये रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार याना प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने कुलभूषणसिंग यांनी अमळनेर चे कर्मचारी हेडकॉन्स्टेबल नंदू पाटील, अर्जुनसिंग याना अमळनेर स्टेशनवर मेमो गाडी आली असता गुन्हेगारांचा शोध घेण्यास सांगितले. तीन चार डबे तपासल्यावर सामान्य कोच मध्ये चार संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांना पोलिसांनी घेराव घालून त्यांची उलट तपासणी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी नायडू गॅंग चे सदस्य असल्याचे कबूल केले.

यात संशयित अविनाश महारनन्ना नायडू (वय २५), अजय महारनन्ना नायडू (वय २५), काली कुन्नईया नायडू (वय २९, तिघे रा वाकीपाडा मरीमाता मंदिर जवळ, नवापूर महाराष्ट्र) तर राजा आरमबम (वय ३३ रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) अशा चार संशयतांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

नायडू गँग मध्ये सात ते आठ सदस्य असून त्यांनी रेल्वे मध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून जप्त केलेल्या साहित्यात दोन लॅपटॉप, ६ मोबाईल, चार्जर, घड्याळ, ४६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत. नायडू गँग चे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


Next Post
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात जामनेरचा तरूण ठार ; गुन्हा दाखल

ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात जामनेरचा तरूण ठार ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हे

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

July 13, 2025
प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group