किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : आपल्या आई- वडिलांचा संवाद हा नम्रपणे असला पाहिजे म्हणजे आपल्याला दिशा मिळते. कर्तुत्वाच्या मागे धावले तर पैसा सहज मिळतो. तसेच आपल्याला काय व्हायचे आहे हे साधायचे असेल तर अश्याच व्यक्तीला भेटा म्हणजे आपल्याला साध्य करता येईल आणि आपले भविष्य आपल्याच हाती असते असे प्रतिपादन पुण्याचे प्रा. विजय नवले यांनी केले.
जामनेर शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आय.एम. आर. कॉलेज व स्वामी विवेकानंद आर्ट कॉमर्स कॉलेज आयोजित विवेक जागर २०२५ कार्यक्रम उत्साहत पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. शिवाजी सोनार, जे.के चव्हाण संस्थेचे सचिव कडू माळी, आय एम आर चे सचिव दिपक पाटील, प्राचार्य डॉ. किशोर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे येथील प्रा.विजय नवले यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की, माझ्या करिअर मधून राष्ट्राचे हित कसे जोपासले जाईल ते महत्त्वाचे आहे असाही मौलिक सल्ला प्रा.विजय नवले यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी करिअर विषयावर व्याख्यान दिले.प्रत्येक विद्यार्थ्याने माझ्या देशाचे करिअर तेच माझे करिअर म्हणून बघितले पाहिजे. रविवारी सुट्टी असताना ज्याला सोमवारची वाट पाहण्यात आनंद होतो तोच करिअर करू शकतो. आपले करिअर या विषयावर व्याख्यान देताना विविध असे मुद्दे प्रा.नवले यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य किशोर पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रा. तेजश्री पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन हे प्रदीप माळी यांनी केले. विवेक जागर कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम पारितोषिक इंदिरा ललवाणी कॉलेज जामनेर यांना तसेच द्वितीय पारितोषिक गरुड कॉलेज शेंदुर्णी ला मिळाले तसेच तृतीय पारितोषिक जनता कॉलेज नेरी यांना मिळाले.