• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गिरीश महाजन व अदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदाच्या निवडीला स्थगिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 20, 2025
in राजकीय
0
गिरीश महाजन व अदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदाच्या निवडीला स्थगिती

दादा भुसे, गोगावले यांना पालकमंत्री न करणे महायुतीला गेले जड !

जळगाव, (प्रतिनिधी) : बहुप्रतिक्षित पालकमंत्री पदाच्या निवडी अखेर शनिवारी जाहीर करण्यात आल्या. मात्र यामुळे महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. यातूनच आता रविवारी रात्री शासनाच्या उपसचिवांच्या सहीने पत्र काढून रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन व अदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदाची निवड आता थांबली आहे.

महायुती सरकारने सत्ता स्थापन केली खरी, मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सुंदोपसूंदी सारखी सुरू आहे. यातच मंत्रिमंडळ निर्माण करणे, मंत्र्यांची निवड करणे, त्यांचा शपथविधी, खातेवाटप या सगळ्यांना महायुतीला खूप वेळ घ्यावा लागला होता. त्याच पद्धतीने पालकमंत्री पदाच्या निवडी देखील रखडल्या होत्या. अखेर शनिवारी दि. १८ जानेवारी रोजी जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले. मात्र यात देखील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकी ३ मंत्र्यांना एकही जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले नाही.

शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते भरत गोगावले आणि दादा भुसे या कॅबिनेट मंत्र्यांसह अजितदादा पवार गटाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि दत्तात्रय भरणे यांना कुठलेही जिल्हे वाटप न झाल्यामुळे चर्चा सुरू झाली होती. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकमेव आमदार असलेल्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळाले. मात्र तेथे शिवसेना व भाजपचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. तसेच त्या ठिकाणी भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळण्यासाठी स्थानिक आग्रही होते. मात्र पालकमंत्री पद मिळत नसल्याचे समजताच अखेर गोगावलेंनी कुठलाही जिल्हा घेतला नाही, अशी माहिती मिळाली आहे.

अशातच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी गोगावले व भुसे यांना पालकमंत्री पद न दिल्यामुळे देखील नाराजी व्यक्त केली होती. त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकूण ७ तर भाजपचे ५ आमदार आहेत. तरीदेखील तेथे नाशिक जिल्ह्यातील नसलेले व भाजपचे संकटमोचक मानले जाणारे जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. यामुळे नाराजीचा सूर जाहीरपणे उमटत आहे. त्यातच दादा भुसे यांना पालकमंत्रीपद अपेक्षित होते. मात्र त्यांनीदेखील पालकमंत्री पद मिळत नसल्याचे पाहत कुठलेही जिल्हे मला देऊ नका असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

यामुळे अखेर राज्य शासनाला रविवारी दि. १९ जानेवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या सहीने नाशिक व रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचे आदेश काढावे लागले आहेत. त्यातच गोंधळ म्हणजे रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्रिमहोदयांची यादी देखील शासनाने जाहीर केली आहे. यात रायगड व नाशिक जिल्ह्याचे ध्वजारोहण हे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन आणि आदिती तटकरे हे करतील असे राज्य शासनाने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

आता हे पत्रक पुन्हा एकदा सुधारित करून नाशिक व रायगड जिल्ह्याचे ध्वजारोहण कोणते मंत्री करतील किंवा या दोन्ही जिल्ह्यांचे ध्वजारोहण ठरल्याप्रमाणे अनुक्रमे गिरीश महाजन आणि अदिती तटकरे हेच करतील काय हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या पुढे मात्र यामुळे मोठा पेच दिसून येत आहे. महायुतीमधील तणाव आता स्पष्ट दिसू लागला आहे. दुसरीकडे विविध योजनांवर अधिक खर्च झाल्यामुळे वित्त विभागावर देखील ताण आलेला असल्याची माहिती महायुतीमधील सूत्रांकडून मिळाली आहे.


 

Next Post
बेघरांच्या स्वप्नातील ‘अमृत महाआवास योजना’ १०० टक्के यशस्वी करा.. – मंत्री गुलाबराव पाटील

बेघरांच्या स्वप्नातील 'अमृत महाआवास योजना' १०० टक्के यशस्वी करा.. - मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add