• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेमविवाह केल्याच्या रागातुन एकाचा खून ; कुटुंबीयांवर कोयते, चॉपरने केले वार..!

सात जखमी ; नऊ जणांवर गुन्हे दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 19, 2025
in गुन्हे
0
प्रेमविवाह केल्याच्या रागातुन एकाचा खून ; कुटुंबीयांवर कोयते, चॉपरने केले वार..!

जळगाव, (प्रतिनिधी) : पळून जाऊन प्रेम विवाह केला या कारणामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर कोयते आणि चॉपरने जबर वार करून तरुणाचा खून केला तर कुटुंबियांना गंभीर जखमी केल्याची फिर्याद रामानंदनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काहींची धरपकड करण्यात आली आहे.

याबाबत मयताचा भाऊ सोनू रमेश शिरसाठ (वय २२, रा. भीम नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. त्याचा भाऊ मुकेश शिरसाठ याने ३ ते ४ वर्षांपूर्वी पूजा शिरसाठ यांच्याशी पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे. तसेच फिर्यादीच्या वहिनी पूजा यांचे आई, वडील व भाऊ हे त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहतात. मुकेश याने पळून जाऊन प्रेम विवाह केला याचा राग पूजा शिरसाठ यांच्या माहेरच्यांना होता.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250119-WA0039.mp4

त्यातूनच रविवारी दि. १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास मुकेश शिरसाठ हा दुकानावर वस्तू आणण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पूजा शिरसाठ यांचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे तसेच त्यांच्यासोबत सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर दोन अनोळखी हे घटनास्थळी आले.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2025/01/VID-20250119-WA0038-1.mp4

त्यांनी मुकेश याला सांगितले की, तू पुजाशी पळून जाऊन लग्न केले. तुझ्या परिवाराला यापूर्वी आम्ही सोडून दिले होते. आता मात्र आम्ही तुझ्या परिवाराला संपवून टाकू असे सांगून त्यांनी त्यांचेसोबत आणलेले कोयते आणि चॉपरने मुकेशच्या मानेवर गंभीर वार केला. तेव्हा तो जोरजोरात ओरडू लागल्याने फिर्यादी सनी शिरसाठ, त्याचे आई-वडील तेथे आले असता त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सनी शिरसाठ याच्या उजव्या बोट्याच्या अंगठ्याला आणि पाठीमागून वार केले. तेव्हा फिर्यादीचे काका निळकंठ शिरसाठ व त्यांची मुले करण, कोमल, काकू ललिता, लहान मुलगा आणि हे तक्रार करण्यास रामानंदनगर पोलीस स्टेशनला जात असताना त्यांना संशयितांनी अडवले.

त्यानंतर संशयित आरोपी सतीश केदार व इतर संशयित आरोपींनी निळकंठ शिरसाठ, ललिता शिरसाठ, करण, कोमल शिरसाठ यांना शस्त्राने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर गंभीर जखमी मुकेश शिरसाठ हा मयत झाला आहे तर इतर कुटुंबीयांमध्ये ७ जण हे जखमी झाले आहेत. फिर्यादीवरून सतीश केदार, प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चार ते पाच संशयित आरोपींची धरपकड केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे पिंप्राळा हुडकोत तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे.

 


 

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
मनाच्या शांततेसाठी परमेश्वराची भक्ती करा.. – भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

मनाच्या शांततेसाठी परमेश्वराची भक्ती करा.. - भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

ताज्या बातम्या

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
जळगाव जिल्हा

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 29, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add