• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; ममुराबाद रोडवरील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; ममुराबाद रोडवरील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील ममुराबाद रस्त्यावरील सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण हा जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. जळगाव शहरात एकापाठोपाठ दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.

विलास रामसिंग भिल (वय ४० रा. ममुराबाद ता.जि.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तालुक्यातील ममुराबाद गावात विलास भील हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. ऊस तोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.

गुरूवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विलास हा दुचाकी (एमएच १० एआय ०३८१) ने जळगाव शहरातून ममुराबाद येथे घरी येत होता. ममुराबाद रस्त्यावरील हॉटेल मितवा जवळून जात असतांना रोडवर समोरून सिमेंटने भरलेले ट्रॅक्टर क्र. (एमएच.१९. पीआय.३३७५) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीस्वार विलास भिल हा जागीच ठार झाला. ही घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचानामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Next Post
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २० जानेवारीला आयोजन

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २० जानेवारीला आयोजन

ताज्या बातम्या

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add