• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्रीमद् भागवत कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते : आ. सुरेश भोळे

गणेशवाडी परिसरात कथा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 10, 2025
in धार्मिक
0
श्रीमद् भागवत कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते : आ. सुरेश भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रीमद् भागवत कथा आणि भागवत सप्ताह याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. श्रीमद्भागवताची कथा ईश्वरप्राप्तीस मदत करते. ही कथा मृत्यूचे भय दूर करून आपल्याला देवाकडे घेऊन जाते आणि भक्तीसोबतच आपले ज्ञान आणि अलिप्तता देखील बळकट करते, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या चौथ्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी समुद्रमंथन, श्रीराम जन्म व चरित्र कथा सुश्राव्य केली. त्यांनी सीता स्वयंवर कथा सांगितली. रामाचा राज्याभिषेक आणि वनवास, सीतेचे हरण, श्रीराम हनुमान भेट असे विविध राम चरित्रातील प्रसंग सांगितले.

पुतळ्यातील रावण दहन करण्यापेक्षा हृदयातील रावणाचे दहन केले पाहिजे. आग लावण्यापेक्षा आग विझवण्यात श्रेष्ठ असतो. त्यामुळे सत्कर्मामध्ये नेहमी सहभाग घेतला पाहिजे. रावणाने मरताना रामाचे चिंतन केले. प्रत्येकाने राम समजून घेतले पाहिजे, असेही मोरदे महाराज यांनी सांगितले. संध्याकाळी आ. राजूमामा भोळे, डॉ. सतीश शिंदाडकर, दिलबागसिंग छाबडा, माजी नगरसेवक डॉ. विरेन खडके, डॉ. प्रशांत बोरोले, डॉ. चेतन पाटील, अमित लड्ढा, मोहन चौधरी, संतोष वाणी, कांतीलाल सोळंकी उपस्थित होते.

Next Post
प्रेस फोटोग्राफर असोसिएशन च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

प्रेस फोटोग्राफर असोसिएशन च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add