• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा संपन्न

इनरव्हील क्लब आणि नॅब यांचा संयुक्त उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 9, 2025
in सामाजिक
0
प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : ब्रेन लिपीचे जनक लुईस ब्रेन यांच्या जयंतीनिमित्त व दर्शन परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त इनरव्हील क्लब आणि नॅब तर्फे सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रज्ञाचक्षु बांधवांसाठी रविवारी राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.

या राज्यस्तरीय सुगम गित गायन स्पर्धेत राज्यभरातून प्रज्ञाचक्षु बांधव व भगिनींनी हजेरी लावली. सकाळी उद्घाटन समारंभात नॅबचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व स्पर्धकांचे, परीक्षकांचे व आलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत सत्कार करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यासाठी परीक्षक म्हणून श्रीमती मोना टेलर व अभय कसबे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी प्रवीण महाजन व सुशील महाजन यांनी तबला व हार्मोनियमवर साथ केली.

स्पर्धेनंतर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले व दोन क्रमांकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाने समीक्षा माकोडे, द्वितीय ज्ञानेश्वर आहेरकर, तृतीय शिवचरण वडमोडे हे विजयी झालेत. तर उत्तेजनार्थ पारितोषिक योगिता गायकवाड व पूजा शेंडे यांना देण्यात आला.

यानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ जळगाव यांच्या वतीने सर्व पारितोषिक प्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ए के नारखेडे, सिंधी पंचायतचे अध्यक्ष सितादास जवाहरानी, राजेश जवाहरानी आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, दर्शन परिवाराचे संजय बडगुजर, अनिल शिंदे यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली. आमदार सुरेश भोळे, विशाल भोळे यांनी ही कार्यक्रमादरम्यान उपस्थिती होती. या कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, संध्या महाजन, तनुजा मोरे, रोहिणी मोरे आदि सदस्य उपस्थित होते. नॅब चे सदस्य, कार्यकारी मंडळ व सचिव सि. डि. पाटील यांची उपस्थित होते.


 

Next Post
चार गावठी पिस्टल, २० जिवंत काडतुससह तरुणाला अटक

चार गावठी पिस्टल, २० जिवंत काडतुससह तरुणाला अटक

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add