• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवा.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये महिला व बालविकास विभागाने करावयाच्या कामांचा आढावा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 6, 2025
in महाराष्ट्र
0
कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवा.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, (वृत्तसेवा) : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला व बालविकास विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे महिला व बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महिला व बालविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधून शहरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीच्या योजना राबवाव्यात. महिला व बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रातील शौचालये स्वच्छ ठेवणे, त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, नागरी बाल विकास केंद्र तातडीने सुरू करण्यावर भर द्यावा.

Tags: #cmomaharashtra#devendrafadnavis
Next Post
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत उडी

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत उडी

ताज्या बातम्या

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक
जळगाव जिल्हा

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

July 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group