• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावठी कट्टा, तलवार घेऊन फिरणारे मामा-भांजा अटकेत ; शनिपेठ पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 2, 2025
in गुन्हे
0
गावठी कट्टा, तलवार घेऊन फिरणारे मामा-भांजा अटकेत ; शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील आसोदा रोडवरील मोहन टॉकीज जवळ देशी कट्टा व हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या मामा-भांजाला शनिपेठ पोलिसांनी दि.३१ डिसेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे की, नववर्षाच्या प्रारंभाच्या अनुषंगाने गुन्हे घडू नये म्हणून शहरात नाकाबंदी व सक्त पेट्रोलिंग सुरू होते. दरम्यान शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या माहितीवरून असोदा रोडवरील मोहन टॉकीज जवळ दोन जण हातात शस्त्र घेऊन दहशत माजवीत आहेत, त्यांनी लागलीच पथक तयार करून दोघ साथीदारांना शस्त्रांसह ताब्यात घेतले.

यात शाम साहेबराव सपकाळे (वय-३०) आणि त्याचा भाचा विशाल उर्फ सोनु धनराज सोनवणे (वय २०) दोघंही रा. आसोदा रोड, मोहन टॉकीजजवळ, जळगाव असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. शाम सपकाळे याच्याकडून जीवंत काडतूसांसह गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू सोनवणे याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्या दोघ मामा भाच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार गिरीश पाटील, अनिल कांबळे, विकी इंगळे, गजानन वाघ, पराग दुसाने, वाहन चालक शाम काळे यांनी केलेली आहे. संशयित विशाल हा आजारी असल्याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. तर शाम साहेबराव सपकाळे यास न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसाची पोलीस कोठडी मंजुर झाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.

Tags: Crime
Next Post
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते घुगे पाटील फाऊंडेशन दिनदर्शिकेचे प्रकाशन

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते घुगे पाटील फाऊंडेशन दिनदर्शिकेचे प्रकाशन

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add