• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा.. – डॉ. विशाल शास्त्री गुरुबा

संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या दुसऱ्या दिवशी भाविक तल्लीन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 27, 2024
in धार्मिक
0
आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा.. – डॉ. विशाल शास्त्री गुरुबा

जळगाव, (प्रतिनिधी) : ज्या आई-वडिलांनी आपला सांभाळ केला, आपल्याला समाजात राहण्यायोग्य बनविले. त्यांना वृद्धापकाळात सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे. कारण आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असा भावार्थ कथा व्यास ह.भ.प. डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांनी केला.

येथील तरुण कुढापा मंडळातर्फे जुने जळगावात मनपा शाळा क्रमांक ३, पांजरपोळ येथे २५ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत श्रीमद् भागवत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी कथा व्यास ह.भ.प. डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांच्या वाणीतून भाविकांना कथा श्रवण केली.

आईच्या मारण्यातही संस्कार..
काही चुकी झाल्यास मुलांना पालकांनी मारू नका, मात्र आईच्या मार खाण्यामध्येदेखील एक प्रकारचा संस्कार असतो, असे ह.भ.प. डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांनी सांगून पुढे म्हणाले, कलियुगात सत्य, संस्कारी माणसाला आयुष्य कमी असते. येथे औरंगजेब १०० वर्षे जगतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे ५० वर्षे जगतात. ज्याप्रमाणे मंदिरात जाऊन आपण प्रदक्षिणा मारतो, त्याप्रमाणे स्वतःलाही प्रदर्शना मारा. कारण प्रत्येकाच्या हृदयात आत्मा असतो, असेही डॉ. गुरूबा म्हणाले.

कथेनंतर सुवर्ण व्यापारी मुरारी शेठ, हॉटेल व्यावसायिक विजय चौधरी, प्रशांत चौधरी, डॉ. बाविस्कर, डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

विविध कार्यक्रमांचे आयोजन..
तरुण कुढापा मंडळातर्फे आयोजित कथेला दिनांक २५ रोजी सुरुवात झाली. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कथा होत आहे. संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या चौथ्या दिवशी २८ रोजी श्रीकृष्ण जन्मउत्सव, २९ रोजी दहीहंडी उत्सव, ३० रोजी विवाह सोहळा, ३१ डिसेंबरला सुदामा चरित्र होणार असून संध्याकाळी कथेची सांगता होऊन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर १ जानेवारी रोजी सकाळी गोपाळ काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

Next Post
जामनेर नगर परिषदेतर्फे सोनबर्डी टेकडी येथे स्वच्छता अभियान

जामनेर नगर परिषदेतर्फे सोनबर्डी टेकडी येथे स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group