• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सिल्लोड जवळील अपघातात पाचोरा तालुक्यातील दोघांचा मृत्यू

उभ्या ढम्परवर आयशर धडकल्याने अपघात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 23, 2021
in गुन्हे
0
सिल्लोड जवळील अपघातात पाचोरा तालुक्यातील दोघांचा मृत्यू

पाचोरा, दि. 23 – सोलापूर जिल्ह्यातील फलटन येथील सहकारी साखर कारखान्यात ऊसतोडीसाठी मजुर घेऊन जात असलेला आयशर ट्रक शुक्रवारी पहाटे सिल्लोड जवळील धानोरा ते भराडी गावाजवळ रस्त्याचे कडेला बंद असलेल्या डम्परवर जावून धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात मोहाडी ता. पाचोरा येथील २७ वर्षीय महिला मजूर तर हनुमानवाडी येथील ३० वर्षीय इसम ठार झाला. तर या वाहनात पाठीमागे बसलेले सहा ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

जखमीवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत कल्पना यमजी पवार यांचे पाश्चात्य पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असून त्यांचेवर शुक्रवारी रात्री मोहाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान घटनेमुळे पाचोरा तालुक्यातील मोहाडी व हनुमानवाडी गावात मोठी शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल होऊन आयशर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मयतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्याची मागणी..
साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी जात असतांना‌ अपघातात कल्पनाबाई पवार व प्रशांत वाघ यांचा मृत्यू झाल्याने फलटन येथील निरा – भिमा सहकारी साखर कारखान्याकडुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मोहाडी येथील माजी सरपंच भिवा शंकर जाधव यांनी कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्याकडे केली आहे.

Next Post
लसीकरण मोहिमेत गोदावरी संस्थेचे कार्य सर्वोत्तम

लसीकरण मोहिमेत गोदावरी संस्थेचे कार्य सर्वोत्तम

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन
खान्देश

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

December 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group