• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लसीकरण मोहिमेत गोदावरी संस्थेचे कार्य सर्वोत्तम

मुंबईच्या समता फाऊंडेशनतर्फे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 23, 2021
in आरोग्य
0
लसीकरण मोहिमेत गोदावरी संस्थेचे कार्य सर्वोत्तम

जळगाव, दि. 23 – कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी प्रतिबंधक असलेल्या लसीकरण मोेहिमेत गोदावरी फाऊंडेशनचे कार्य हे सर्वोत्तम असल्याचे मत समता फाऊंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आले. लसीकरण मोहिमेत गोदावरी फाऊंडेशनने सामाजिक जाणीवेपोटी राष्ट्रकर्तव्य पार पाडले आहे. दरम्यान या कार्याची दखल घेत मुंबईच्या समता फाऊंडेशनतर्फे आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजीत या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह समता फाऊंडेशनचे एरिया मॅनेजर शिवनंद महालिंगे, मॅनेजर मोहन केंद्रे, हेल्थ अ‍ॅक्टीव्हिटी इन्चार्ज तानाजी गौंड, हेल्थ ऑफिसर राम लंके, राजेंद्र दौड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे उपस्थित होते. समता फाऊंडेशन हे आरोग्य, बंदीगृह, शिक्षण आणि रोबोटीक शिक्षण या क्षेत्रात कार्य करते. तसेच आदीवासी क्षेत्रातही संस्थेमार्फत काही शाळा दत्तक घेण्यात आल्या.

भुसावळ तालुक्यातील खडका, किन्ही, कन्हाळा बु. आणि खु. या ठिकाणी समता फाऊंडेशन, गोदावरी फाऊंडेशन, ग्रामपंचायत, सहायक जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. पांढरे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे १० हजार नागरिकांना पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला. या मोहिमेत गोदावरी फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. गोदावरी फाऊंडेशनतर्फे नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल समता फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी संस्थेचे आभार मानले.

दरम्यान या निमीत्ताने समता फाऊंडेशनतर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच संस्थेचे प्रतिनीधी म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रवीण कोल्हे यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. भविष्यात गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून मोतिबिंदु शस्त्रक्रियेसाठीही समता फाऊंडेशन कार्य करणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.


 

Next Post
जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूच्या चौकशीचे आदेश

जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूच्या चौकशीचे आदेश

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add