जळगाव, (प्रतिनिधी) : परिवर्तन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या वतीने परिवर्तन मैत्र महोत्सव दिनांक २१ ते २९ डिसेंबर असा नऊ दिवसाचा भरगच्च महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शहरातील भाऊंच्या उद्यानात एम्फी थियेटर मध्ये रोज सायंकाळी सहा वाजता विविध प्रयोग सादर होणार आहेत. गेल्या वर्षापासून परिवर्तन “मैत्र” महोत्सवाची सुरुवात झाली आहे. सर्व कलांना एकत्र करून कलेचा अविष्कार घडवणे हे परिवर्तनच नेहमीच ध्येय आहे.
सतत होणाऱ्या महोत्सवांमुळे सांस्कृतिक पायाभरणी होत असून जळगाव शहराला सांस्कृतिक ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न देखील जैन उद्योग समूह व परिवर्तन यांनी नेहमीच केला आहे. यामुळेच या महोत्सवात संगीत, साहित्य, नृत्य, नाट्य, चित्रकला अशा विविध कलांचा समावेश करण्यात आला आहे. रसिकांना या सर्व कलांचा आस्वाद या महोत्सवात घेता येणार आहे. स्थानिक कलावंतांच्या सोबतच मुंबई, पुणे व नागपूर येथील गाजत असलेल्या कलाकृतीचा आस्वाद देखील रसिकांना मिळणार आहे.
या महोत्सवाचे प्रमुख डॉ. रेखा महाजन, इंजि. प्रकाश पाटील, नंदू अडवाणी, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, इंजिनीयर विनोद पाटील, उद्योजक स्वरूप लुंकड, पारस राका, मानसी गगडाणी असणार आहेत. यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा होणार आहे. जैन उद्योग समूह व अशोक जैन यांचे मोलाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे. या महोत्सवासाच्या यशस्वीतेसाठी परिवर्तनचे नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, हर्षल पाटील, सुदीप्ता सरकार, होरीलसिंग राजपूत, मनोज पाटील, विजय जैन, बिना मल्हारा, मानसी जोशी, अंजली पाटील, लीना लेले, जयश्री पाटील, सुनील बारी, विनोद अजनाडकर, नेहा पवार, विकास वाघ, श्र्वेतांबरी गरुड, मंगेश कुलकर्णी, उदय सपकाळे, भगवान भोई, अनिल जानकिराम चौधरी, योगेश चौधरी, प्रवीण पाटील, गणेश सोनार प्रयत्न करीत आहेत. हा महोत्सव सगळ्यांसाठी खुला असून रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवर्तन व जैन उद्योग समूहा कडून करण्यात आले आहे.