जळगाव, (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनला निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली झाल्यानंतर पद रिक्त होते. मंगळवारी त्यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते. निकम यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केल्यानंतर दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी मंगळवारी नवीन आदेश जारी केले आहे. जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक संदीप भटू पाटील यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुक केली आहे.
मंगळवारी संदीप पाटील यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तसेच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर, आगामी काळामध्ये गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासह गुन्हे कमी होण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती दिली.