• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्रकाराचा कॅमेरा हिसकावल्याप्रकरणी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 11, 2024
in जळगाव जिल्हा
0
पत्रकाराचा कॅमेरा हिसकावल्याप्रकरणी मनपाच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : महानगर पालिकेत जुनी पाईपलाईन चोरी, नगर रचना विभागातील लाच प्रकरण गाजत असताना पत्रकाराला दमदाटी करण्याचा प्रकार समोर आला आहे. येथील पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावून त्यातील मेमरी कार्ड काढून घेतल्या प्रकरणी महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की विक्रम कापडणे हे बातमी संकलित करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेत लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने व्हिडीओ शूटिंग करत होते. दरम्यान तेथे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे आले असता त्यांनी कापडणे यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला व एका कर्मचाऱ्याजवळ देत त्यातील मेमरी कार्ड देखील काढून घेतले. त्यानंतर विक्रम कापडणे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम कापडणे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला. यावेळी घटना घडताना भांडारपाल आणि मनपातील काही कर्मचारी तेथे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय कार्यालयात शूटिंग करण्यास मनाई आहे असं काही आपल्याकडे जजमेंट आहे का? असा प्रश्न विचारला त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कापडाने यांना कॅमेरा परत दिला.

या प्रकरणावर पोलीस तपास सुरू असून सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांची भूमिका व त्यांचा प्रतिवाद काय आहे, यावर तपशील येणे अपेक्षित आहे. तसेच, पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा निषेध केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी पत्रकारितेचे महत्त्व असून, अशा घटना पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पत्रकारांनी केला.

Next Post
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या निरीक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
खान्देश

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

December 3, 2025
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group