• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 11, 2024
in शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली.

भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित ‘फाउंडर्स डे’ च्या सुरवातीला अनुभुती बालनिकेतनच चिमुकल्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. सुशील अत्रे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन परिवारातील जेष्ठ सदस्य गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांचे सह ज्योती जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, अंबिका जैन यांची उपस्थिती होती.

भारतीय सांस्कृतिक वारसा जपणारी आणि जागतिक दृष्टीवर आधारित अद्वितीय अशी अनुभूती निवासी शाळा आहे. यातील विद्यार्थ्यानी तबला, बासरी, गिटार या वाद्यांवर फ्युजन सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन झाले. त्यांच्या सोबत २०१६ व २०१८ चे विद्यार्थी उपस्थित होते. अनुभुती स्कुल ही शाळा नसुन एक कुटुंब आहे असे माजी विद्यार्थी आकांक्षा असनारे व तुषार कावरे यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक मुल्यावर सचित्र पेटिंग साकारले.

आरंभी म्युझिकल योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. गीत गायन आणि नृत्यामध्ये रुढीपरंपरा मानणा-या आजीला मनविणारी नाटिका जी कौटुंबिक मूल्यांची उलगडा करत होती. ती विद्यार्थ्यांनी सादर केली. नात्यातील प्रेम, भावना आणि विश्वास यातुन अधोरेखित झाले. शेतकरी कुटुंबातील कथा नाटिकेतुन सांगितले. त्यानंतर पारंपारिक नृत्य सादर करून एकात्मकतेचा जागर केला. याप्रसंगी अनुभुतीमधील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांविषयी सांगितले. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी अर्थव कांबळे, हीतेशी बनोथ, अरिन देशपांडे, अलेफिया शकिर, क्रीश संघवी, वरधिने अग्रवाल, अवियुक्त जैन यांनी सुत्रसंचालन केले.

 


 

Next Post
पर्ससह अडीच लाख लंपास करताना तीन भामटे जेरबंद

पर्ससह अडीच लाख लंपास करताना तीन भामटे जेरबंद

ताज्या बातम्या

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
खान्देश

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

December 3, 2025
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group