शोभायात्रेने शहरवासीयांचे वेधले लक्ष
किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त जामनेर येथे तेली समाजाच्या वतीने संत जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोष साजरी करण्यात आली आहे. शहरातील नगरपरिषद चौकात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करून शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, श्रीराम महाजन, सुभाष पवार, रवींद्र झाल्टे, शरद पाटील आदी मान्यवरांसह तेली समाज बांधव उपस्थित होते. यावेळी वाकडी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संत सुपडू गिरी महाराज यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृह येथून शोभायात्रा काढण्यात आली यात्रेचा मार्ग बजरंगपुरा, सुतार गल्ली, माळी गल्ली, नगरपालिका चौक, भुसावळ रोड जामनेर या ठिकाणी समारोप करण्यात आला. शोभायात्रेत अशोक चौधरी यांनी संताजी जगनाडे महाराज यांची भूमिका करत सजिव आरास साकारली. दरम्यान समाज बांधवांनी पांढरा पोशाख व महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
यावेळी संतोष चौधरी, अरुण चौधरी, सोपान चौधरी, निलेश चौधरी, सुरेश चौधरी, अविनाश चौधरी, किरण चौधरी, मयूर चौधरी, दत्तात्रय पाटील, गणेश चौधरी, किशोर चौधरी, रामेश्वर चौधरी, अशोक चौधरी, तेजस चौधरी, तुषार चौधरी, निरज चौधरी, वैशाली चौधरी, शोभा चौधरी, स्वाती चौधरी, दिपाली चौधरी, लक्ष्मी चौधरी आदी महिलां देखील सहभागी होते.