जळगाव, (प्रतिनिधी) : महामार्ग लगतच्या खेडीतील डॉ. आंबेडकर नगर व भोईवाडा या भागात दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक झाली होती. त्या आगीत प्रिती निवृत्ती गाटे, लिलाबाई भोई, मंगलाबाई चौधरी, विकास भोई यांचे संसार उपयोगी सामान, कपडे, धान्य जळून खाक झाले होते.
याबाबतीत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या कडे मदतीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष्याचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पाठपुरावा करून स्फोटातील गरीब कुटुंबियांना जैन उद्योग समुहाकडून घर संसार उपयोगी सामान द्यावे अशी विनंती करण्यात आली होती.
त्याअनुषंगाने चार कुटुंबियांना संसार उपयोगी सामान संच देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अनिल अडकमोल, जैन उद्योग समुहाचे अनिल जोशी, गायत्री सोनवणे, छोटू साबळे, साधना गायकवाड, निलेश भालेराव, विकास भोई यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.