• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात शिक्षकाने छताला गळफास लावून केली आत्महत्या

गुजराल पेट्रोल पंप परिसरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 29, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात शिक्षकाने छताला गळफास लावून केली आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या गुजराल पेट्रोल पंप मागील परिसरात असलेल्या एका अकॅडमीच्या शिक्षकाने अकॅडमीच्या वर असलेल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

राहुल अंबादास पाटील (वय ३५, रा. प्रवीण अकॅडमी, जळगाव) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, भाऊ, यांच्यासह राहत होता. प्रवीण अकॅडमी येथे गेल्या ९ वर्षापासून तो शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तो पोटाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

दरम्यान गुरुवारी दि. २८ रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत त्यांनी अकॅडमीत एक्स्ट्रा तासिका घेतली. त्यानंतर राहुल पाटील हे अकॅडमीच्या वर असलेल्या राहत्या घरी गेले आणि त्यांनी ३ वाजेच्या सुमारास त्यांनी ओढणीच्या साहह्याने छताला गळफास घेत आत्महत्या केली.

कुटुंबीयांना कळताच त्यांनी आजूबाजूंच्या नागरिकांच्या मदतीने राहुल पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून राहुल पाटील यांना मयत घोषित केले. या वेळेला कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

राहुल पाटील यांनी, पोटाच्या आजारामुळे ग्रस्त असल्यामुळे आत्महत्या करीत आहे. याला कोणालाही दोषी धरू नका अशा आशयाची चिट्ठी लिहिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव तालुक्यात सातत्याने आत्महत्यांचे सत्र सुरू असल्यामुळे खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे.

काय म्हटले आहे, सुसाईड नोट मध्ये ?
मी, राहुल पाटील असे लिहून देतो कि, माझ्या पोटाच्या विकारांमुळे तसेच सततच्या आजारपणामुळे हे पाऊल उचलत आहे. माझ्या या गोष्टीला कोणीही जबाबदार नसेल. सॉरी फॉर ऑल ऑफ यू… माझ्या आत्महत्येमागे प्रवीण अकॅडमीचा कुठेही संबंध नाही. त्यामुळे त्यांची बदनामी कोणीही करू नये हि विनंती.


 

Next Post
गॅस सिलेंडर स्फोटातील कुटुंबीयांना जैन उद्योग समूहाकडून संसार उपयोगी संचाचे वाटप

गॅस सिलेंडर स्फोटातील कुटुंबीयांना जैन उद्योग समूहाकडून संसार उपयोगी संचाचे वाटप

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add