लालसिंग पाटील | भडगाव, दि. 17 – ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ असे म्हटले जाते राज्यशासन व केंद्र शासनही मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून विविध योजना राबवित असतात, तर बऱ्याच ठिकाणी आपण स्त्रीभ्रूणहत्या झाल्याचे ऐकतो. मात्र कजगाव येथील महाजन दाम्पत्याने कन्यारत्नाचे स्वागत करून चांगला संदेश दिलायं.
कजगावातील पत्रकार संजय महाजन यांचा मुलगा हर्षदीप सैन्यदलात कार्यरत असून काही दिवसांपूर्वी हर्षदीप पती-पत्नीस कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी आपली मुलगी घरी आल्यानंतर संपूर्ण घर सजवून रस्त्यावर फुले टाकत घरात प्रवेश केला. लक्ष्मी रूपे पावले हळद कुंकवाने सजवून घरात प्रवेश केल्यानंतर आनंद साजरा करण्यात आला.
मुलगी वाचेल तरंच प्रगती होईल, सवित्रीच्या लेकिना कायम समाजात सन्मानाची वागणूक मिळायला हवी मग ती आई, बहीण, पत्नी, मुलगी अथवा कुठलीही स्त्री असो.. तिचा सन्मान झालाच पाहिजे, मुलींची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. असा महाजन दाम्पत्याने संदेश दिला.