पाचोरा, (प्रतिनिधी) : येथील पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बहिण- भावाच्या लढतीकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून होते. दरम्यान महायुतीचे उमेदवार आ. किशोर पाटील यांनी हॅट्रिक साधत महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा ३८ हजार ६८९ मतांनी पराभव केला आहे.
आ.किशोर पाटील यांना २६ व्या फेरीअखेर ९७ हजार ३६६ तर वैशाली सूर्यवंशी यांना ५८ हजार ६७७ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांनी ५८ हजार ७१ मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे.
पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रताप हरी पाटील यांना ५६८८ मते मिळाली आहेत. तर अपक्ष माजी आ. दिलीप वाघ यांना ५२५९ आणि अपक्ष डॉ. निळकंठ पाटील यांना ११४६ मध्ये मिळाले आहेत.