एरंडोल, (प्रतिनिधी) : येथील एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांचा विजय झाला असून महाविकास आघाडीचे सतीश भास्कर पाटील यांचा ५६ हजार ३३२ हजार मतांनी पराभव केला आहे. आता आ. चिमणराव पाटील यांचा विकासकामांचा वारसा पुत्राकडे गेला असून अमोल पाटील पहिल्यांदाच आमदार झाले आहे.
अमोल पाटील यांना २२ व्या फेरीअखेर १ लाख १ हजार ८८ तर सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष भगवान महाजन यांनी ४१ हजार ३९५ मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. एरंडोल व पारोळा तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अपक्ष ए. टी. पाटील यांना १५७६ तर हर्षल माने यांना ६३७३, डॉ. संभाजीराजे पाटील २८४५ मते मिळाली आहे.