• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ; दुपारी एक वाजेपर्यंत चित्र होणार स्पष्ट

जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषदेत माहिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 21, 2024
in जळगाव जिल्हा
0
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ; दुपारी एक वाजेपर्यंत चित्र होणार स्पष्ट

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया शनिवार दि.२३ रोजी पार पडणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. एकूण १६० टेबल्सवर जिल्हाभरात मोजणी होणार असून दुपारी १ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे, यासंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपस्थित होते. सुरुवातीला मतदान प्रक्रियेत कर्तव्यावर असताना अपघातात निधन झालेले शिक्षक लक्ष्मीकांत पाटील आणि भडगाव येथे हृदयविकाराने निधन झालेले विजय भास्कर पाटील यांना आदरांजली वाहून त्यांच्या वारसांना १५ लाख रुपये दिले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

दरम्यान जिल्ह्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाविषयी सविस्तर आकडेवारीनुसार माहिती दिली. यात जिल्ह्यात एकूण ६५. ८० टक्के मतदान झालेले आहे. मतमोजणीला सर्वाधिक टेबल हे जळगाव शहरात २० असून चोपडा येथे १४, रावेर १४, भुसावळ १४, जळगाव ग्रामीण येथे १४, अमळनेर येथे १४, एरंडोल १४, चाळीसगाव १४, पाचोरा १४, जामनेर १४, मुक्ताईनगर १४ असे एकूण १६० टेबल लागणार आहेत.

या मतमोजणी प्रक्रियेत २१६ एवढे कर्मचारी मतमोजणीला राहतील. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत पोस्टल मतदानाची नोंदणी होऊन त्याची माहिती ९ वाजेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सुरु होणार असून साधारण दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Tags: Election
Next Post
दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार ? पहा..

दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार ? पहा..

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group