• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

भुसावळ शहरातील व्यायामशाळेतील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 20, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील श्री संत गाडगेबाबा महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्याने व्यायामशाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडील व्यायामशाळेत आले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा गळफ़ास लावून घेतल्याचे दिसले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव करण मनोहर पाटील (वय २१) असे आहे. तो संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला होता. दरम्यान, रविवारी जुन्या तालुका पोलिस ठाण्याच्या मागील व्यायाम शाळेत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. करण पाटीलचे वडील हनुमान व्यायामशाळेत गेल्या पंधरा वर्षांपासून जात आहेत. आज दुपारी ते नित्य-नियमाप्रमाणे दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास व्यायामशाळेत गेले असता त्यांना समोर त्यांचा मुलगा गळफास घेतल्याचे दिसले.

हे बघून त्यांना धक्काच बसला. परिसरातील युवकांनी व नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. करण हा महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहत होता. शनिवारी हॉस्टेलमधून घरी आला. दुपारी मित्रांसोबत गप्पा मारल्या, तेव्हा हसत खेळत होता. कुठलाही ताणतणाव दिसत नव्हता. अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. तो एकुलता एक होता. घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस स्टेशन चे पोलीस घटनास्थळी दाखल होत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Next Post
निवडणूक कर्मचाऱ्याचा मोटरसायकल अपघातात मृत्यू

निवडणूक कर्मचाऱ्याचा मोटरसायकल अपघातात मृत्यू

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add