• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी ; रुग्णालयात एकाचा मृत्यू

जळगाव शहरातील राजमालती नगरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 20, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी ; रुग्णालयात एकाचा मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील राजमालती नगरामध्ये आपापसात असलेल्या जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली यात एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज बुधवारी सकाळी पहाटे ६ वाजता घडला. दरम्यान या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहे.

सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय वर्ष ३६ रा. राज मालती नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून मजुरी काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सिद्धार्थ वानखेडे याच्यावर पूर्वी हृदयासंबंधी बायपास सर्जरी झाली होती, दरम्यान हाणामारीत छातीवर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेत विशाल अजय सुरवाडे (वय २८), जानू संजू पटेल (वय २०), फैजान राजू पटेल (वय २४) आणि मयूर हाजी बिस्मिल्ला पटेल (वय ४२) सर्व रा. राजमालती नगर हे सर्व जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात सिद्धार्थ वानखेडे याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शनिपेठ चे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचा सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी व रुग्णालयात माहिती घेण्यासाठी दाखल झाले.

या प्रकरणातील सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या मारहाणीचा राजकिय, निवडणुक किंवा मतदानाशी कोणताही संबंध नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता मतदानासाठी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. या घटने संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/11/Untitled-46_720p.mp4

Tags: Crime
Next Post
जखमी पोलिस पाटलाचा मृत्यू ; वाळू ट्रॅक्टरने दिली होती धडक

जखमी पोलिस पाटलाचा मृत्यू ; वाळू ट्रॅक्टरने दिली होती धडक

ताज्या बातम्या

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!
खान्देश

अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ३ महिला ताब्यात!

October 25, 2025
जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारची राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड! रत्नागिरीत सुवर्णपदक पटकावले

October 25, 2025
पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!
खान्देश

पालवी जैनच्या ‘स्वदेशी खरेदी करा’ आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

October 25, 2025
बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड
खान्देश

बेकायदेशीर पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड

October 24, 2025
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध
खान्देश

“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

October 23, 2025
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत
खान्देश

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

October 23, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group