जळगाव, दि. 17 – युवासेनेच्या ११ व्या वर्धापन दिवसानिमित्त जळगाव शहरातील ५०० हुन अधिक व्यापारी, युवा उद्योजक, डॉक्टर व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बांधवांना महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनात विराज कावडीया, अमित जगताप यांनी समक्ष भेटून दिली. या वेळी सरकार विषयी त्यांचे मत व अपेक्षा जाणून घेतल्या.
सदर भेटींचे सविस्तर माहिती अहवाल शिवसेनाप्रमुख पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे तसेच युवासेना सचिव वारुण सरदेसाई, संपर्क प्रमुख संजय सावंत यांना देण्यात येणार आहे.
सरकार करीत असलेले कार्य व विविध योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकपर्यंत पोहचावी व त्यांना लाभ व्हावा, हा या उपक्रमा मागचा उद्देश आहे.
१७ ऑक्टोबर २०१० साली मुंबई येथील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदूहृद्य सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेना स्थापन करण्यात आली होती. तदनंतर मागील ११ वर्षात युवासेना देशभरात शिक्षण, रोजगार व आरोग्य या क्षेत्रात सतत लक्षणीय कार्य करीत आहे.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमहानागरप्रमुख प्रशांत सुरळकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश चौधरी, शिवसैनिक विराज कावडीया, अमित जगताप, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, भूषण सोनवणे, पियुष गांधी, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अंकित कासार, संकेत कापसे, तेजस दुसाने, यश सपकाळे, यशश्री वाघ, कविता पवार, वैष्णवी खैरनार, उमाकांत जाधव, राजेश वारके, आदींनी परिश्रम घेतले.