• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुऱ्हा वढोदा योजनेचा पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक.. – डॉ.बी.सी.महाजन

रोहिणी खडसे यांनी प्रचार रॅलीत नागरिकांचे घेतले आशीर्वाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
कुऱ्हा वढोदा योजनेचा पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक.. – डॉ.बी.सी.महाजन

रोहिणी खडसे यांनी प्रचार रॅलीत नागरिकांचे घेतले आशीर्वाद

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : कुऱ्हा- कुंड धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनी यशस्वी करून मार्गी लावला होता, त्यांच्यामध्ये पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याची धमक आहे. कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्या पाठपुरावा करतील. कुऱ्हा परिसराने कायम आ.एकनाथराव खडसे यांना साथ दिली. आता रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा विश्वास कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा, थेरोळा, तालखेडा, उमरे, जोंधनखेडा, हिवरा, राजुरा, बोरखेडा, काकोडा पारंबी येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संवाद दौरा काढून मतदारांशी संवाद साधून मतदारांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलतांना डॉ.बी.सी. महाजन म्हणाले, कुऱ्हा वढोदा परिसरातील शेती सिंचित होऊन कोरडवाहू परिसर हिरवागार होऊन शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी आ.एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा वढोदा परिसर उपसा सिंचन योजना आणली. ती पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला परंतु द्वेषभावनेतून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी मिळाला नाही. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी रोहिणी खडसे यांना विधानसभेत पाठवा. त्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक आहे. नाथाभाऊ यांचा विकासाचा वारसा पुढे नेऊन मतदारसंघाचा विकास करण्यासाठी रोहिणी खडसे यांना साथ देण्याचे डॉ. बी.सी. महाजन यांनी आवाहन केले.

यावेळी विशाल महाराज खोले यांनी सांगितले की, कोरोना काळात कुऱ्हा येथे लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभारणीसाठी रोहिणी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. सेंटर सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. स्वखर्चातून कोविड सेंटर साठी तीस बेड आणि मास्क औषधे उपलब्ध करून दिले. रोहिणी खडसे या जनतेच्या सुखदुःखात धावून येणाऱ्या सर्वसामान्य उमेदवार आहेत.

गेल्या तीस वर्षांपासून आ.एकनाथराव खडसे हे कुऱ्हा वढोदा परिसराच्या उन्नतीसाठी झटत आहेत पहिल्यांदा मुक्ताईनगरचे आमदार झाल्यानंतर त्यांनी कुऱ्हा परिसराला पक्क्या डांबरी रस्त्यांनी जोडले. कुऱ्हा परिसराचा पूर्वी पावसाळ्यात पुरामुळे मुक्ताईनगर परिसराशी संपर्क तुटत होता. नाथाभाऊंनी सर्व नदी नाल्यांवर लहान मोठया पुलांची निर्मिती केली. धुपेश्वर पुलाची निर्मिती करून कुऱ्हा परिसराला मलकापूरसोबत जोडले. त्यामुळे दळणवळण सोयीचे होऊन व्यापार वाढला, नातेसंबंध जवळ आले. नाथाभाऊ यांनी इको टुरिझम अंतर्गत वढोदा येथील मच्छिन्द्रनाथ संस्थान आणि चारठाणा येथील भवानी माता मंदिर परिसरात भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

प्रत्येक गाव खेड्याला डांबरी रस्त्यांनी जोडून गावागावात सभागृह, अंतर्गत रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा सारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रोहिणीताई खडसे या समाजकारणातून राजकारण करत असून नाथाभाऊ यांनी मतदारसंघात आणलेली विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी त्या सक्षम उच्चशिक्षाविभूषित उमेदवार असून मतदारसंघाचे प्रश्न त्या सक्षमपणे विधानसभेत मांडून सोडवू शकतात असे बाजार समितीचे माजी सभापती निवृत्ती पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


 

Tags: #political
Next Post
महाजनांच्या बालेकिल्ल्यात खडसेंची तोफ गडगडणार

महाजनांच्या बालेकिल्ल्यात खडसेंची तोफ गडगडणार

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group