• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मतदारसंघाचा शाश्वत विकासासाठी माझी उमेदवारी.. – धनंजय चौधरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मतदारसंघाचा शाश्वत विकासासाठी माझी उमेदवारी.. – धनंजय चौधरी

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर यावल विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी यावल तालुक्यातील दुसखेडा, कठोरा, कासवा, अकलूद येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. सकाळी गुलाबवाडी येथून सुरु झालेली प्रचारफेरी मोरव्हाल, विश्राम जिन्सी, जिन्सी, आभोडा खु., आभोडा बु., रमजीपूर, बक्षीपूर, खिरोदा प्र.रावेर, रसलपूर आदी भागातून काढण्यात आली.

यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधतांना धनंजय चौधरी यांनी तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असून, मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी आशीर्वाद देण्याची विनंती केली.

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून अकलुद फाटा ते दुसखेडा पेपरमिल रस्ता डांबरीकरण, अकलुद ते आमोदा रस्ता डांबरीकरण तसेच कासवा येथे संत गंजानन महाराज मंदिराजवळ सभामंडप बांधकाम व गावातंर्गत काँक्रीटीकरण अशी विविध विकास कामे झालेली आहेत. अडीच वर्षे महायुती सरकारने कामे थांबविल्यामुळे निश्चितच काही कामे राहुन गेलेली आहेत, ती पूर्ण करण्यासह परिसराचा विकासाचा अनुशेष पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला. प्रचार फेरीत त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
कुऱ्हा वढोदा योजनेचा पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक.. – डॉ.बी.सी.महाजन

कुऱ्हा वढोदा योजनेचा पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक.. - डॉ.बी.सी.महाजन

ताज्या बातम्या

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गुन्हे

हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

May 5, 2026
शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला
गुन्हे

शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 5, 2026
पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न
जळगाव जिल्हा

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

May 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group