• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास.. – आ. भोळे

खेडी, ज्ञानदेव नगर, विठोबा नगर भागात प्रचार रॅली संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास.. – आ. भोळे

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघमधील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना प्रचारात दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत असून शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात खेडी, ज्ञानदेव नगर, तळेले कॉलनी, दशरथ नगर भागात आ. भोळे यांना आबालवृद्धांपासून महिला भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

खेडी येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर आ. भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. शिवनगर, डॉ. आंबेडकर नगर, इंदिरा नगर परिसर, विठोबा नगर, ज्ञानदेव नगर, सुंदर नगर, महादेव नगर, दत्त नगर, प्रेमचंद नगर, योगेश्वर नगर, तळेले कॉलनी मार्गे दशरथ नगर येथे रॅलीचा समारोप झाला. मार्गात नागरिकांनी रांगोळ्या काढून, फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा भोळे यांचे औंक्षण केले.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241108-WA0058.mp4

प्रचार रॅलीतून मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद देत दाखवलेला उत्साह हा अभूतपूर्व असून या प्रचार रॅलीने खेडी, ज्ञानदेव नगर परिसरात वातावरण महायुतीसाठी अनुकूल असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. जनतेच्या भरभरून मिळालेल्या प्रेमातून आपल्याला आगामी विजयाचा विश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली. प्रसंगी रॅलीमार्गातील विविध मंदिरात जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेत आ. भोळे यांनी आशीर्वाद घेतले.

रॅलीमध्ये मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी नगरसेवक प्रवीण कोल्हे, रंजना सपकाळे, डॉ. वीरेन खडके, भरत कोळी, धुडकु सपकाळे, विजय वानखेडे, निलेश तायडे, प्रदीप रोटे, किसन मराठे, बंटी भारंबे, गणेश सपकाळे, विनोद चौधरी, धनराज पाटील, संदीप बऱ्हाटे, नाना देशमुख, उज्ज्वल चौधरी, सुषमा चौधरी, निशा पवार, भारती म्हस्के, पुष्पा तळेले, पिंटू बेडिस्कर, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, पियुष कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अर्चना कदम, रिपाई (आठवले) गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, नाना भालेराव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: #political
Next Post
मतदारसंघाचा शाश्वत विकासासाठी माझी उमेदवारी.. – धनंजय चौधरी

मतदारसंघाचा शाश्वत विकासासाठी माझी उमेदवारी.. - धनंजय चौधरी

ताज्या बातम्या

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स
क्रिडा

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 28, 2025
‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण

July 28, 2025
खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 28, 2025
लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार

July 28, 2025
रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान

July 27, 2025
जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group