• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रांगोळ्या, पुष्पहाराने आ.राजूमामांचे जोरदार स्वागत ; जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

महायुतीच्या रॅलीला प्रभात चौक, समर्थ कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर, महाबळ परिसर येथे उत्तम प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
रांगोळ्या, पुष्पहाराने आ.राजूमामांचे जोरदार स्वागत ; जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

जळगाव, (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना प्रचारात लोकप्रियता लाभत असून गुरुवारी दि. ७ रोजी दुपारी दुसऱ्या टप्प्यात प्रभात चौक, समर्थ कॉलनी, लक्ष्मी नगर, ओंकारेश्वर मंदिर, महाबळ परिसर येथे उत्तम प्रतिसाद मिळाला. आ. भोळे यांच्या प्रचार मार्गात अनेक गल्लींमध्ये नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून आ. राजूमामांचे पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले. अनेक गल्ल्यांमध्ये जेष्ठ नागरिकांनी स्वतःहून पुष्पहार अर्पण करून विजयासाठी सदिच्छा दिल्या, या प्रेमाने आ. राजूमामा भोळे भारावले.

प्रभाग क्र.१२ मध्ये भाजप मंडळ क्रमांक ६ येथे गुरुवारी दुपारी महायुतीतर्फे प्रचार रॅली काढण्यात आली. नागरिकांनी मार्गावर सडा-समार्जन करून रांगोळ्या काढत आमदार राजूमामा भोळे यांचे सहर्ष स्वागत केले. लक्ष्मी नगर भागात पक्षाचे चिन्ह ‘कमळ’ फुलाचे मोठे चित्र काढून त्याखाली “फक्त राजूमामाच” असे लिहून फटाक्यांच्या आतिषबाजीत शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. प्रभात चौकातील मारुती मंदिर येथे पूजा करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

तेथून एम.जे.कॉलेज गेट, समर्थ कॉलनी परिसर, ओंकारेश्वर मंदिर परिसर, सानिका कॉर्नर मार्गे गिरणा टाकी परिसर, पार्वती नगर, मायादेवी नगर परिसर, महाबळ कॉलनी परिसर मार्गे साईबाबा मंदिर येथे समारोप करण्यात आला. प्रचार मार्गात आ. भोळे यांनी ओमप्रकाश जाजू, माजी नगरसेविका गायत्री राणे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, माजी आ. चंदूभाई पटेल, भागवत भंगाळे, माजी नगरसेवक इंद्रजित पारख, माजी उपनगराध्यक्ष अशोक परदेशी आदी मान्यवरांच्या घरी भेटी दिल्या. ओंकारेश्वर मंदिर येथे आ. भोळे यांनी भगवान महादेवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

रॅलीमध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, माजी आ. चंदूभाई पटेल, मंडळ अध्यक्ष बापू कुमावत, माजी नगरसेवक गायत्री राणे, श्रीराम खटोड, सरिता नेरकर, अजित राणे, राहुल चौधरी, राजेंद्र खैरनार, विनोद भामरे, आशिष वाणी, नितीन इंगळे, जीवन अत्तरदे, ज्योती निंभोरे, निला चौधरी, सविता बोरसे, सुवर्णा भंगाळे, वासंती चौधरी, मयूर भोळे, अमित भाटिया, शक्ती महाजन, मोहन बेंडाळे, रेखा पाटील, शिवसेना पक्षाचे नेते तथा माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, आशुतोष पाटील, स्वप्निल परदेशी, पियुष कोल्हे, रिपाई (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विनोद देशमुख, लता मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon_city#political
Next Post
स्वतःच्या मतदारसंघातच चिखल तुडवणारा मंत्री काय विकास करेल.. – आ. रोहित पवार

स्वतःच्या मतदारसंघातच चिखल तुडवणारा मंत्री काय विकास करेल.. - आ. रोहित पवार

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group