विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नगरदेवळा येथे प्रचार रॅलीतून मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद देत दाखवलेला उत्साह हा अभूतपूर्व असून या प्रचार रॅलीने नगरदेवळा परिसरात वातावरण शिवसेनामय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून या रॅलीतून आपल्याला आगामी विजयाचा विश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे. दरम्यान प्रचार रॅलीला अभुतपुर्व असा प्रतिसाद मिळाला.
आज बुधवारी सकाळी शहरातील कालीका मंदीरा पासुन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत नागरिकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वागत केले. पुढे प्रचार रॅली भडगाव दरवाजा मार्गे , बारद्वारी, राम मंदिर, होळी मैदान, गणपती दरवाजा, अग्नावती चौपाटी, परदेशी गल्ली , हनुमान मंदिर, वाघनगर, वाणी गल्ली, आझाद नगर, भावसार गल्ली, शिंपी गल्ली आदी भागात फिरून प्रचार रॅलीचा समारोप शिवसेना कार्यालय येथे करण्यात आला.
रॅलीत आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील, शितल सोमवंशी, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, भैया महाजन, अब्दुल गनी शेख, सागर पाटील, विनोद परदेशी, रविंद्र पाटील, विनोद राऊळ, नामदेव महाजन, धनराज चौधरी, नूर बेग, आदित्य परदेशी, अविनाश कुडे, प्रदिप परदेशी, गोरख महाजन, अरविंद परदेशी, भाऊसाहेब पाटील, दिलीप राऊळ, रोहीदास पाटील, सोनू परदेशी, सुनिल शिल्पी, सिताराम बागुल, राकेश शिरुडे, भास्कर पाटील, अंजली चव्हाण, पुनम पाटील, मनिषा पाटील आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती होते.
आम्ही विकासासाठी तुमच्या सोबत..
आमदार किशोर पाटील हे नगरदेवळा शहरात रॅली निमित्त आले असता अनेकांनी त्यांना थांबवून ‘तुम्ही मतदारसंघात केलेल्या विकासामुळेआम्ही तुमच्या सोबत आहोत असे उद्गार काढले. तुमचा विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगतीले. तर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ही ग्रामस्थांना तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमच्या स्वप्नातील विकास करू असे आश्वासन दिले.